गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
डॉ. विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्ष, महाविकास आघाडीची बाजी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
महायुतीचा घोडेबाजार फसला
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांनी सहज विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. कावरे यांनी मतदान करून डॉ. कावरे यांचा विजय निश्चित केला.
विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशीव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले. लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत “डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे” असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला.
नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
गावागावातुन
“सेवाभावातून वयोवृद्धांना नवसंजीवनी..!” ब्राह्मणी येथे ‘वयोश्री योजना’ अंतर्गत आरोग्य तपासणी व मोफत सहाय्यक साधन शिबिर यशस्वी संपन्न..!
ब्राह्मणी (ता. राहुरी) : (प्रतिनिधी)
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य व स्वावलंबनासाठीची बांधिलकी जपत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर संचलित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र यांच्या वतीने ‘वयोश्री योजना’ अंतर्गत दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी व सहाय्यक साधन वितरण शिबिर नुकतेच ब्राह्मणी येथे यशस्वीपणे पार पडले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार), अॅलिम्को, कानपूर आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ते ‘वयोश्री योजना’चे पात्र लाभार्थी ठरले आहेत. या लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानपट्टा, काठी इत्यादी विविध सहाय्यक साधनांचे विनामूल्य वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या साधनांची एकूण अंदाजित किंमत ₹४७,१३,२३८ इतकी आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मा. खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र हे पुन्हा एकदा समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. या केंद्रामार्फत दररोज अनेक वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सल्ला, वैद्यकीय मदत आणि सहाय्यक साधनांची सुविधा पुरविली जाते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत ब्राह्मणीचे सरपंच सुरेश मानकर तसेच अॅलिम्को, कानपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेमुळे वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वाभिमानाचे तेज पुन्हा झळकले.
“सेवाभावातून समाजसेवा” हे ब्रीद जपत,
डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी
वयोवृद्ध नागरिकांसाठी पुन्हा एकदा
‘आशेचा किरण’ निर्माण केला आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
