संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

Share

मंचर प्रतिनिधी

संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असून आपल्या निरगुडसर गावातही मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.

या सप्ताहात ज्येष्ठांची संख्या भरपूर आहे काही प्रमाणात तरुण देखील आहेत. मात्र गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुणाची सहभाग घेतल्यास कार्यक्रमाला अधिक शोभा येईल असे मत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

श्री धर्मराज बीज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह समाप्तीचे दिवशी काल्याचे किर्तन संपन्न झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले की निरगुडसर गावात गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. शेवटच्या दिवशी ह भ प धनंजय महाराज चव्हाण यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.

त्यांनी त्यांच्या कीर्तनात श्रीकृष्ण यांच्या लीला सांगितल्या समाजाला विविध उपदेश दिले. मात्र कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी याचा बोध घेऊन किर्तन ऐकून घरी जात असताना कीर्तनातील चांगल्या गोष्टीं आत्मसात करून त्याचे आचरण आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील श्री महादेवाच्या मंदिराचे काम सुंदर झाले.

असुन पुढील काही दिवसात या मंदिर उत्सवाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. असेही वळसे पाटील म्हणाले,

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे ,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नितीन टाव्हरे, आनंदराव वळसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, प्रमोद वळसे, रामदास थोरात, भाऊसाहेब वळसे,सुनील टाव्हरे, उर्मिला वळसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या