गावागावातुन
काठापूर बुद्रुक येथे वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण मोठ्या बंदोबस्तात वनविभागाने हटविले.
निरगुडसर प्रतिनिधी (राजु देवडे)
काठापुर बुद्रुक ( ता.आंबेगाव ) येथे वनविभागाच्या हद्दीतील गट.नं.१४५ मधील २० हेक्टरवरी घरे ,कोप्या व शेतीचे अतिक्रमण हटवल्याचे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.

२०१९ मध्ये या ठिकाणी काही लोक वास्तव्यास आले होते. त्यांनी वनविभागाच्या हद्दीत जमीन कसण्यास सुरुवात करून ज्वारी,केळी, जनावरांचा चारा ही पिके घेण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांनी आपले दावे ग्रामस्तरीय, जिल्हास्तर, उपविभाग स्तरावर दाखल केले होते. परंतु हे दावे फेटाळण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या वतीने दि. (६) रोजी उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदेश पाटील,सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटवण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.
यावेळी खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक उपस्थित होते.

खेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या उपस्थितीत मंचर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय अरुण फुगे, पारगाव ( कारखाना) पोलीस स्टेशनचे स.पो.नि.नेताजी गंधारे स.पो.नि बालाजी कांबळे,पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे,सोमेश्वर शेटे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी तेरा कुटुंबांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी वनविभागाचे मोठा प्रमाणावर कर्मचारी उपस्थित होते.

अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर,पिकअप, टेम्पो ,यांचा वापर करण्यात आला.यावेळी ॲम्बुलन्स व अग्निशमन बंब सुद्धा उपलब्ध करण्यात आले होते.यावेळी स्थानिक वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गिते.व कर्मचारी उपस्थित होते.
गावागावातुन
व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट
शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत
व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.
सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.
सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.
गावागावातुन
भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
