मंचर (प्रतिनिधी)
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे गडदादेवी सार्वजनिक उत्सवा निमित्त गडदादेवी मंदिरात हभप रामायणाचार्य संतोष महाराज बढेकर ( जारकरवाडी ) यांच्या सुश्राव्य वाणीतुन दहा दिवस ही कथा संपन्न होत आहे. शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्म, सीता स्वयंवर, केवल प्रसंग, राम भरत भेट, शबरी भेट, बाल सुग्रीव भेट, श्रीराम राज्याभिषेक सोहळा कथेत सादर करण्यात येत आहेत. या कथेला भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. ही कथा ऐकण्यासाठी पोंदेवाडी परिसरातील दोन हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहत असल्याची माहिती ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली आहे.

रामायण कथेतील प्रसंग, पात्रे आणि शिकवण हुबेहूब सादर होत असल्याने ग्रामस्थ या कथेत मंत्रमुग्ध होताना दिसतात विशेष म्हणजे स्थानिक लोक कथेतील पात्र कलाकाराचे काम करतात त्यामुळे या कथेला रंगत येती. दहा दिवस चालणाऱ्या कथेत वेशभूषा पात्रता करून प्रत्यक्षात रामायण कसे घडले हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बढेकर महाराज यांनी सांगितले. कथेसाठी येणाऱ्या भाविकांना लकी ड्रॉ पद्धतीने दररोज एक ग्रंथाचे वाटप करण्यात येत आहे.
या नामयज्ञ सोहळ्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यातून दररोज अन्नदान होत असल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर, प्रकाश दौंड, अमोल वाळुंज आणि पोंदेवाडी ग्रामस्थांनी सांगितले.
