देशविदेश
सातासमुद्रापार बाप्पाची आराधना महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालला असुण यामध्ये दररोज हरिपाठ,आरती, लकी ड्रॉ, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व तरुण मंडळी
महाराष्ट्रमधून असून यामध्ये
गौरव पुरुषोत्तम कापसे(बुलढाणा), निखिल बोऱ्हाडे(पुणे), योगेश जाधव(पुणे),अभिजित भड (पुणे), गजानन रिठे (बीड), प्रथमेश हिंगे (पुणे) केतन सोनार(जळगाव), प्रशांत भाटे, प्रशांत कोरडे, प्रद्युम्न देशमुख, जयेश शेलार(चाकण), ऋषिकेश चव्हाण(सातारा), तन्मयी सुतार (पुणे), आदी उपस्थित व यांच्या पुढाकाराने उत्सव पार पडला.
गणेश मूर्तीचे सौजन्य पुणे (खेड)येथील प्रशांत कोरडे या युवकाने भारता मधून येतानाच श्रींची मूर्ती सोबत आणली होती.
हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थानापन्न करण्यात आली. या वर्षी हा गणेशोत्सव 9 दिवस सुरु होता. दररोज सकाळ संध्याकाळ आरती तसेच बाप्पासाठी नैवेद्य तसेच वेगवेगळे प्रसाद बनवून नैव्यद्य दाखविला गेला. तर या कार्यक्रमाची सांगता रविवार दिनांक 15सप्टेंबर2024 रोजी झाली….
देशविदेश
दूध दरवाढ आणि भेसळीविरोधात खा. लंके आक्रमक शेतकरी आणि ग्राहकांशी निगडीत प्रश्नावर संसदेत आंदोलन
अहिल्यानगर : प्रतिनिधी
दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे.मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहेत. या शेतकरी आणि ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. दुधाची दरवाढ आणि भेसळीविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने दोन्ही प्रशनावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनात खासदार नीलेश लंके इंडिया आघाडीचे खासदार नामदेव किरसान, शोभाताई बच्छाव, बळवंतराव वानखेडे, छत्रपती शाहू महाराज, धैर्यशील मोहिते पाटील, श्याम बर्वे, संजय देशमुख, प्रियंका चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, बजरंगबप्पा सोनवणे,अरविंद सावंत, डॉ.कल्याण काळे आदी सहभागी झाले होते.
खासदार नीलेश लंके व इतर खासदारांनी संसद भवनात आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी दूध भेसळीचा प्रतिकात्मक प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या आंदोलनादरम्यान खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुधाचे बाजारभाव वाढले पाहिजेत, दुधाचे दर उत्पादन खर्चाच्या आधारे ठरवले गेले पाहिजेत,भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी करत खासदारांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार नीलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा लढा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी व सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आहे. दुधाला बाजारभाव नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. महाराष्ट्रात दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये उत्पादन खर्च येतो. याचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाले पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून, भेसळीमुळे विशेषतः लहान मुलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे.
गावागावातुन
जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार -ना. विखे पाटील
दिंडीच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष
अहिल्यानगर, दि.२६ प्रतिनिधी
जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सूरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प.अशोक सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्ग सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग निर्हेण ते शेगुड पर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरूस्त कराव्यात. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मुलभूत सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत. दिंड्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात यावे.
यावर्षी पालखीच्या सुरूवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्यावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

श्री.विखे पाटील म्हणाले, ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व शौचालयाची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल.
वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पालखीमार्गावर आवश्यक साधनांसह तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर देवस्थानाचा ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रूपये अनुदान व प्रत्येक वारकऱ्यास पाच लाख रूपयांचा विमा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी – निर्मल वारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार शिवाजीराव कर्डीले, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ यांनीही वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने सूचना केल्या.
याबैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
गावागावातुन
मतदार संघात मल्टीमोडल लॉजिस्टिक हब हवा खासदार नीलेश लंके यांची आग्रही मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली. खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले.
खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग आणि रोजगाराला गती मिळेल याकडे लक्ष वेधत लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठीही रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास खा. लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांना फायदा, रोजगार निर्मिती
खासदार नीलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योग यांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील.
आवष्यक जमीन व स्थानिकांचा पाठींबा
या हबसाठी या परिसरात आवष्यक जमीन उपलब्ध असून स्थानिकांचा सक्रीय पाठींबा या प्रस्तावास लाभला असल्याचे खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले. सागरमाला योजनेचा उद्देश म्हणजे बंदरांना राज्याच्या आतील भागांशी जोडणे हा आहे त्यामुळे हे क्षेत्र त्यासाठी अत्यंत योग्य असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन नगर-श्रीगोंदे-कर्जत हबला सागरमाला प्रकल्पात समाविष्ट करावे अशी मागणी करतानाच हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रगतीची नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.
निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र
नगर, श्रीगोंदे व कर्जत तालुके हे जेएनपीटी बंदरांशी रेल्वेने थेट जोडलेले असून एम.एच.१६० महामार्ग शिर्डी, पुणे विमानतळ आदी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. या भागात द्राक्षे, डाळिंब, कांदा, उस, गहू, जैविक उत्पादने मोठया प्रमाणात उत्पादीत होत असून निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र म्हणून या भागाकडे पाहिले जात असल्याचे खा. लंके यांनी यावेळी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
