धामणीतील खंडोबा मंदिरात ३० डिंसेबरला सोमवती सोहळ्याचे आयोजन

Share

मंचर : प्रतिनिधी
धामणी ( तालुका आंबेगांव
जि पुणे) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात मार्गशिर्ष कृष्ण पक्ष सोमवती (३० डिंसेबर२० २४)अमावस्येला सोमवारी खंडोबाच्या पंचधातुच्या मुखवट्याला शाहीस्नान.पालखीची वाजतगाजत मिरवणूक व मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‌ धामणी ग्रामस्थांनी केले आहे.

                                                       सोमवतीला सोमवारी खंडोबा म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्याला शाहीस्नान घालण्यासाठी व पालखी मिरवणूक. महाप्रसाद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे.नगर.नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित राहतात.

नाशिक व पुणे जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या कुळांचा व उपस्थित सर्व भाविक ग्रामस्थ व महिला यांचे देवस्थानच्या वतीने मानपान करण्यात येणार आहे.

त्यानंतर धामणीच्या पेठेतून पालखीचेलोणी,धामणी,संविदणे,कवठे येथील देवाचे मानकरी पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन त्यानंतर मंदिरात उपस्थित सर्वाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवतीच्या शाहीस्नान.पालखी मिरवणूक व महाप्रसाद कार्यक्रमात सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ व देवाचे सेवेकरी मंडळीनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या