आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची बॅनरबाजी

Share

मंचर प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये इच्छुक असणाऱ्या इच्छुकांनी बॅनरबाजी करून मतदारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत जिल्हा परिषद निवडणुका कधी जाहीर होतील हे निश्चित नसले तरी आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणारे विशाल वाबळे व विशाल भोर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो टाकून नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याआधीच जिल्हा परिषदेची मोर्चेबांधणी महाविकास आघाडी कडून केली जात असल्याची चर्चा आंबेगाव तालुक्यात आहेत.

तर कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उद्योजक गोविंद खिलारी यांनीही नविन वर्षाच्या शुभेच्छा देत बॅनर लावले आहेत. या बॅनरवर त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या नेत्यांचे फोटो न टाकल्याने ते कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहेत याचा बोध होत नाही.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला . महाविकास आघाडीचे उमेदवार भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांचा निसटता पराभव झाला त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील राजकारणामध्ये शांतता असल्याचे जाणवते आहे.

प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यावेळी अगदी काठावर निवडून येणे हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता आहे.दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी प्रथमतः विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना कडवी झुंज दिली.

आमदार दिलीप वळसे पाटील यांचा विजय देवदत्त निकम यांनी काही शेकडो मतांवर आणून ठेवला. त्यामुळे कमी मताने पराभव झाल्याने देवदत्त निकम व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज आहे .अशी परिस्थिती असतानाही पराभूत उमेदवार देवदत्त निकम यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते ,शेतकरी व मतदार यांच्यामध्ये जाऊन पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

देवदत्त निकम यांनी पराभवानंतरही हार न मानता सुरू केलेले तयारी पहाता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत ,मंचर नगरपंचायत या निवडणुकांमध्ये देवदत्त निकम महायुतीच्या विरोधात मोर्चे बांधणी करत असल्याची शक्यता आहे .

त्यामध्येच देवदत्त निकम यांचे सहकारी असलेले विशाल वाबळे व विशाल भोर यांनी कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे .त्यादृष्टीने त्यांनी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी नववर्षाच्या शुभेच्छा देत कळंब चांडोली बुद्रुक गटात बॅनरबाजी केली आहे.

तर कळंब चांडोली बुद्रुक गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उद्योजक गोविंद खिलारी यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटात बॅनर लावले आहेत.गोविंद खिलारी यांच्या बॅनरवर त्यांचाच फोटो असल्याने ते नक्की महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. की महायुतीकडून याचा बोध होत नाही. की अपक्ष उभे राहणार? हे आगामी काळात समजलेच..

एकंदरीत आंबेगाव विधानसभा मतदार संघात निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रंगतदारच होणार आहे. अशी परिस्थिती आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.बॅनरबाजी करुन महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी प्रचाराला सुरुवातच केली आहे का? उद्योजक गोविंद खिलारी हे अपक्ष लढणार की महाविकास आघाडी किंवा महायुती त्यांना उमेदवारी देणार हे आगामी काळात समजलेच


सध्या मात्र नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी विशाल वाबळे, विशाल भोर , गोविंद खिलारी यांनी केलेल्या बॅनरबाजीची खमंग चर्चा सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या