देशविदेश
कुकडी व घोड प्रकल्पातुन प्रत्येकी चार आवर्तन मिळणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
अहील्यानगर दि. ६: प्रतिनिधी
कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.विशेष म्हणजे कुकडी आणि घोड प्रकल्प निर्मिती नंतर या लाभक्षेत्राच्या आवर्तनाचा निर्णय करणारी बैठकच प्रथमच अहील्यानगर येथे घेण्यात आली.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून ना.विखे पाटील यांच्याकडे कार्यभार आला आहे.विभागाच्या सर्व कामकाजाचा आढावा त्यांनी घेतल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकांंना प्रारंभ केला आहे.कुकडी आणि घोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनीधी आणि अशासकीय सदस्यांची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र .१ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून सद्या सुरू असलेले आवर्तन क्र.१ धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वाच्या संमतीने शिक्कमोर्तब करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) , ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, शरद सोनवणे, नारायण आबा पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), समितीची सदस्य आदी उपस्थित होते.
मा.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणी नुसार नियोजन करावे.पीकाची नोंद नसेल पाणी नाही ही भूमिका घ्यावी लागेल आशा सूचना देवून मंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी देण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात.सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरुन पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. पिंपळगाव जोगा कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषदेने पाणी साठविण्यासाठी साठवण तलावाच्या पर्यायावरही विचार करावा. कुकडी कालव्या लगतची झाडे – झुडुपे काढण्यासाठी साखर कारखान्यांनी जेसीबी उपलब्ध करून दिल्यास इंधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. धरणातील गाळ काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे, यासाठी उद्योग संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करावा,यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.
कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १९.४३६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे दुसऱ्या आवर्तनासाठी २० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचे बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा, तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तनाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
घोड प्रकल्पात २.४६ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाचे दुसरे आवर्तन २० फेब्रुवारीपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. श्रीगोंदा आणि शिरूरच्या लोकप्रतिनिधीं सोबत चर्चा करून नियोजन करावे अशी सूचना मंत्री विखे पाटील यांनी केली.
बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजना बाबत सादरीकरण केले.
बैठकीस कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, प्रशांत कडूस्कर, उत्तम धायगुडे, राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.
देशविदेश
केंद्रीय मंत्री अमित शहा यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट!शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती
लोणी दि.९ प्रतिनिधी
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहील्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.
महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री
अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
गावागावातुन
शरद पवार अजित पवार एकत्र येतील.. ?राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपेंनी घेतली शरद पवारांची भेट.
पुणे:प्रतिनिधी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील असे चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का ? ही चर्चा सुरू झाली आहे.
चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपे म्हणाले साहेब आमच्या सर्वांचेच आहेत, साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखे आहेत कायम राजकारण हा विषय नसतो साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांचे नेतृत्वाखाली मी असेच शिकलो आहे.
की राजकारण हा केवळ एक महिन्यापुरता विषय असतो एवढा एक महिन्यापूर्वी राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकायचं असतं. त्यामुळे साहेबांची माझ्या वडिलांची आणि दादांची जी शिकवण आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण पाहत नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत हा निर्णय मोठ्या पातळी वरचा आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे दोन्ही पवार नेहमी सांगतात एकमेकांना भेटतात वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते करतील असे देखील तुपे म्हणाले आहे.
गावागावातुन
वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सी.आय.डी च्या हाती
बीड: प्रतिनिधी
राज्यात खळबळ उडवणाऱ्या बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता महत्त्वाचे अपडेट पुढे आले आहे या प्रकरणात हत्येचा आरोप असलेला वाल्मीक कराड पुण्यात असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडच्या शोधात सीआयडी कडे महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक विश्लेषणात वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सीआयडी च्या हाती लागल आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार होण्यापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात वास्तव्यास होता 17 डिसेंबरला वाल्मीक कराड याचे शेवटचे ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवल आहे. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आहे. पुण्यात मोबाईल बंद करून तो फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीडच्या मस्साजोकचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून घेरण्यात आला आहे, तसेच वाल्मीक कराडचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना ही लक्ष्य करण्यात येत आहे. वाल्मीक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माजी गटनेता आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड सांभाळत असल्याचं सांगितलं जात आहे .
वाल्मीक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच वाल्मीक कराडचे अनेक नेत्यांबरोबरही फोटो आहेत ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे केज पोलीस ठाण्यात कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन6 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 month ago
देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन6 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
मनोरंजन1 year ago
शिवरायांचे मावळे आम्ही