दिल्ली प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज दिल्ली येथे एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला ते 92 वर्षाचे होते. एक अर्थतज्ञ म्हणून डॉ मनमोहन सिंग यांची जागतिक स्तरावर ख्याती होती भारताचे पंतप्रधान म्हणून काम करताना त्यांनी देशासमोर असणारी अनेक संकटे पेलवत भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले

काँग्रेस पक्षातील मितभाषी नेते म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती . भारताचे माजी गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस पक्ष उभा करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध केले.
सयमी नेता , अर्थतज्ञ, भारताचा काँग्रेसचा चेहरा व भारताचे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांचे नाव नेहमीच स्मरणात राहील .
एम्स रुग्णालयात कॉग्रेसचे नेते दाखल
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रुग्णालयात राजकीय नेत्यांची धाव घेतली काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली असून ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.

