गावागावातुन
वाल्मीक कराड सापडला पण… मयत सरपंच संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का?

पुणे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण दोन्हीही ढवळून निघाले आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्यापही देशमुख यांचे मारेकरी सापडले नाहीत. या मारेकरांचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला असताना आज वाल्मीक कराड सीआयडीकडे पुणे येथे हजर झाले आहेत
वाल्मीक कराड हेच मयत संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत का? जनता विचारते आहे? कारण आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरीत्या वाल्मीक कराड यांच्यावरच आरोप केले आहेत. मात्र वाल्मीक कराड यांच्यावर पोलिस स्टेशनला फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध नाही. असा बीडमधील एक मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह वाल्मीक कराड हेच या खुनाचे सूत्रधार आहेत .आणि त्यामुळेच ते पोलिसांपासून दूर पळत होते असा आहे .
आज वाल्मीक कराड यांनी पुणे शहरात सीआयडी कार्यालयात स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गृह विभाग वाल्मीक कराड यांची कसून चौकशी करून संतोष देशमुख यांचे यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार आहेत का याचा शोध घेतील आणि वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेली खंडणीचा गुन्हा याबाबतही चौकशी करून पोलीस वाल्मीकरांवर योग्य ती कारवाई करतीलच अशी अपेक्षा बाळगू या..

वाल्मीक कराड याला सापडणं पोलिसांना का शक्य झालं नाही??
*सरकारमधील काही मंत्र्यांनी वाल्मीक कराडला जाणीवपूर्वक पोलिसांपासून दूर ठेवले का?
*मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात गेल्याने वाल्मीक कराड पोलिसात हजर झाला आहेत का?
*आणि संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का? यावर या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील काळात आपणाला वाटच पहावी लागेल…
गावागावातुन
नागापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वळती, नागापूर (ता. आंबेगाव)
(दि. १५) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील विद्यार्थ्यांनी मंथन आणि NSSE (नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा) या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य गुणवत्ता व जिल्हा गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवले आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे :
- निशांत विकास पवार — इयत्ता : ३ री
- NSSE : राज्यात ८ वा
- मंथन : राज्यात ९ वा
- युवराज गणेश यादव
- NSSE : राज्यात १२ वा
- आरोही किरण मंचरे
- मंथन : राज्यात ७ वी
- सिद्धी अशोक लोखंडे
- मंथन : केंद्रात ५ वी
या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भरत म्हस्के, मनिषा निकम, बबुशा निकम, शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, वैजयंती मंचरे, विकास पवार, अशोक लोखंडे, पोलीस पाटील संजय पोहकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन बोऱ्हाडे मॅडम यांनी मानले.
राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे नागापूर ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. नागापूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. भविष्यात शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा कमी पडू दिल्या जाणार नाहीत, असे लोकनियुक्त सरपंच गणेश यादव यांनी सांगितले.
गावागावातुन
शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक: ना.विखे पाटील

महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन संपन्न
लोणी दि. ५ प्रतिनिधी

पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने, पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सांगोला महाविद्यालयात आयोजित २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,
दुष्काळमुक्त महाराष्ट्र
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे की राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणे राज्याचे धोरण असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्याची कार्यवाही सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुराचे अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून नदी जोड प्रकल्पांना चालना दिली जात आहे. “राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर देऊन पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आज वातावरणातील बदलाचा मोठा परीणाम सिंचन व्यव्सथेवर होतो.यासाठी सोलर पॅनलच्या वापरामुळे धरणांवर वीज निर्मिती होईल आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणात वाळू आणि गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे, याबाबत लवकरच उपाय योजना करण्यासाठी विभागाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.
यापुर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी पाणी उपलब्ध होण्यासाठी मोठे काम केले.त्यांना दि.मा.मोरे यांच्या सारख्या अभ्यासू लोकांची साथ मिळाली आज त्यांच्या प्रस्तावांना पुढे घेवून जाण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या ही परिषदेतून येणार्या सूचना आणि शिफारसी राज्य सरकार निश्चित स्विकारेल आशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
प्रदूषण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा
मंत्री विखे पाटील यांनी नदीकाठच्या शहरांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा उत्सर्जनामुळे प्रभावित गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित पाणीसाठे करण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अनेक धरणात गाळ साठल्याने पाणी क्षमता कमी झालेली असून धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. ही “सिंचन परिषदेच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या सूचना आल्यास शासन त्यावर सकारात्मक विचार करून त्या अनुषंगाने धोरण तयार करेल, असे त्यांनी नमूद केले.
सिंचन प्रकल्पांना गती
जलसंपदाचे सचिव संजय बेलसरे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. “सिंचन व्यवस्थापनात आवश्यक बदल सुचवल्यास, त्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सोडविल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन
यावेळी भारतीय हवामान खात्याकडून स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्राद्वारे हवेतील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा आणि पर्जन्यमानाची माहिती पुण्यातील हवामान विभागाला पाठविली जाते. ही माहिती व त्या अनुषंगाने आवश्यक सूचना स्थानिक शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे पाठवण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
सिंचन परिषदेत सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे आणि सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आणि जलसंपदाचे योग्य व्यवस्थापन हे महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. व यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
गावागावातुन
पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुले मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती

पारनेर : प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. ३ मध्ये ७९९ व टप्पा क्र.४ मध्ये ३ हजार ५२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गरजू नागरीकांचे घराचे स्वप्न घरकुले मंजुर झाल्याने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबाला घर मिळवून देणे, दारित्रय रेषेखालील कुटूंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात घरकुलांची मोठया प्रमाणावर मागणी होती. यापूर्वी काही घरकुलांना मंजुरी मिळाली. यावर्षी मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटूंबांच्या घरकुलाचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून त्यांचे जीवन साकार होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे यात समाधान असल्याचे लंके यांनी सांगितले.
एकूण मंजुर घरकुलांपैकी ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, इतर काही अडचणी असतील तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, लाभार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समितीमधील सर्व संगणक चालक, विस्तार अधिकारी यांनी या घरकुलांच्या मंजुरीसाठी परीश्रम घेतले.
प्रथमच ४ हजारांवर घरकुले !
दुष्काळी पारनेर तालुक्यात घरकुलांची मागणी मोठी असणे साहाजिक असून आजवर मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. घरकुलांबाबत केंद्र सरकारने धोरण घेतल्यानंतर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आपल्या संपर्क कार्यालयाकडूनही वारंवार घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत विविध ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. एकत्रीत प्रयत्नांतून तालुक्यात प्रथमच तब्बल ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली यात मोठे समाधान आहे.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन7 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन9 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक5 months ago
देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन9 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक2 months ago
शेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
महाराष्ट्र1 year ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
गावागावातुन10 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर