Connect with us

सामाजिक

कै. बाळासाहेब विखे पाटलांनी जे स्वप्न पाहिले, ते आज साकार होत आहे. – डॉ. सुजय विखे

Published

on

Share

सुपा प्रतिनिधी

पारनेर तालुक्याच्या जिरायत भागासाठी कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे आणि ते सत्यात उतरत असल्याचा आनंद होत असल्याची भावना डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द बाळासाहेब विखे पाटील यांनी दिला होता, तो शब्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पूर्ण करत आहेत. सत्ता आणि पद यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करून जनतेची सेवा करण्याचे बहुमूल्य काम नामदार साहेबांच्या हातून घडत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रमांतर्गत कुकडी कालव्याचे विशेष अस्तरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ. सुजय विखे बोलत होते. कुकडी कालवा अस्तरीकरणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून जास्तीत जास्त क्षेत्र हे सिंचनाखाली येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विक्रम सिंह कळमकर, गणेश शेळके आदी मान्यवर, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आमदार काशिनाथ दाते, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे व गणेश शेळके यांची समायोजित भाषणे देखील यावेळी झाली.

डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जे काही अपवाद घडले, त्यातून आपल्याला शिकायला हवं. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय मान्य करून आम्ही पुढे चालत आहोत. अनेक गावांतील मागण्या नव्याने समोर आल्या आहेत. यामध्ये जातेगाव व पळवे गावाचा समावेश उपसा सिंचन योजनेच्या सभेमध्ये केला जाईल. उपसा सिंचन सर्व्हेचे सर्वेक्षणाचे काम आता काही दिवसातच सुरू होईल असा विश्वास देखील डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितानं दिला.

तसेच पाण्याचे नियोजन न करता जर वाटेकरी वाढले तर कोणताही घास शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जलसिंचनाच्या योजनांमध्ये आपल्याला काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील असे देखील ते म्हणाले. मी पराभूत झालो तरी नागरिकांना दिलेला शब्द मी पूर्ण केला व जे काम राहिलेले आहेत, ते देखील मी पूर्ण करत आहे. ९०० कोटींच्या साखळी योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याचे काम पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण करणार असल्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आणि ही कामे फक्त आम्हीच करू शकतो असं देखील ठणकावून डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना खुले आव्हान केले आहे की, आपण लोकसभेला व विधानसभेला जो शब्द दिला होता, तो सत्यात उतरवला आहे का? आपण रेकॉर्डिंग करून लोकांना जो शब्द दिला होता तो पूर्ण झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित करून खासदार निलेश लंके यांच्यावर त्यांनी टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, दिलेले शब्द पूर्ण करण्याची ताकद फक्त विखे पाटील कुटुंबामध्ये आहे आणि ती आम्ही वेळोवेळी सिद्ध देखील केली आहे.

पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी आता कोणाशीही भांडण्याची गरज भासणार नाही. कारण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुकडी असेल पठार भागातील उपसा सिंचन योजना असेल अशा विविध योजना मार्गी लागण्याचे काम झपाट्याने होत आहे. काही लोक टीका करतील त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो, आमचं काम सुरू आहे. केवळ आश्वासनांवर जगणाऱ्या तालुक्याला आता प्रगतीचे आणि विश्वासाचे राजकारण हवे, असे देखील सुजय विखे पाटील यांनी सांगितले व माझी एवढीच विनंती आहे की, कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नका. मी सांगतो फोटो नाही काढणार, व्हिडिओ पण नाही काढणार, पण पाणी तुम्हाला आम्हीच देणार असा देखील शब्द यावेळी त्यांनी दिला.

तसेच त्यांनी बोलताना स्पष्ट केले की, येथे अनेक नवे चेहरे आले आहेत. काहींनी माझ्या विरोधात मतदान केले असेल, पण हरकत नाही. आता नव्याने सुरुवात करूया. तालुक्याला न्याय देण्याचे काम आपण सगळ्यांनी मिळून करूया असे साध्य करून विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देखील दिली. तसेच शब्द दिला तर तो पूर्ण करणारच असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी विशाल वाबळे

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात ‌. विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारगावच महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका

Published

on

Share

मंचर

आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे तर महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे .


तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

TNS इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती यशस्वीपणे संपन्न

Published

on

Share

“ITI विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारा ‘C2IC’ प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण”

अहिल्यानगर (ता. नगर):
TNS इंडिया फाउंडेशन (TNSIF), मुंबई आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, अहिल्यानगर यांच्यात दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, रोजगार संधी आणि उद्योगसज्जतेसाठी “Campus to Industrial Careers (C2IC)” हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील १०३ विद्यार्थ्यांनी एकूण २०० तासांचे सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.या प्रशिक्षणामध्ये वैयक्तिक, व्यावसायिक व पर्यावरणपूरक ग्रीन स्किल्स चा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.प्रशिक्षणामध्ये समाविष्ट घटक:
योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व आत्ममूल्यांकन,CV तयार करणे, अर्ज प्रक्रिया व मुलाखतीसाठी तयारी,सहकारी व ग्राहकांशी संवाद कौशल्ये,ईमेल शिष्टाचार, कार्यस्थळी वर्तन व नोकरीतील नैतिकताग्रीन स्किल्स प्रशिक्षण:इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान,EV बॅटरी व इलेक्ट्रिक मोटर कार्यप्रणाली,सौर पीव्ही मॉड्यूल्स व त्यांची स्थापना,नूतनीकरणीय ऊर्जा, टिकाऊ विकास व पर्यावरण संरक्षण
प्रशिक्षणानंतर दि. २० जून २०२५ रोजी, संस्थेमध्ये पुढील नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती आयोजित करण्यात आल्या UKB Electronics Pvt. Ltd., रांजणगाव MIDC,Bajaj Electricals Ltd., महाळुंगे इंगळे, तळेगाव-चाकण रोड या मुलाखतींमधून एकूण ३९ विद्यार्थ्यांची थेट निवड करण्यात आली,ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित रोजगाराच्यासंधी उपलब्ध झाल्या.
याउपक्रमामुळेविद्यार्थ्यांमध्ये:आत्मविश्वासात लक्षणीय वाढ,संवाद कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास,उद्योग क्षेत्रातील वास्तव समज,पर्यावरणपूरक विचारसरणी व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख,यामुळे विद्यार्थी स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ लागले आहेत.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा मंत्री व संस्था अध्यक्ष ,डॉ. सुजय विखे पाटील – मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. पी. एम. गायकवाड – डायरेक्टर जनरल (प्रशासन),श्री. सुनील कोल्हापुरे – डायरेक्टर (टेक्निकल),डॉ. अभिजीत दिवटे – डायरेक्टर (मेडिकल),प्राचार्य श्री. ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे,गटनिदेशक श्री. पठारे व श्री. भुसे,प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के,TNSIF प्रतिनिधी श्री. प्रणव गोडले संपूर्ण शिक्षक व ITI टीमचे अभिनंदन केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण प्रक्रिया नव्हे, तर कौशल्य, रोजगार आणि औद्योगिक सज्जतेचा व्यापक आराखडा ठरला आहे. उद्योगाभिमुख उपक्रम,आधुनिक तंत्रज्ञान. प्रशिक्षण,इंटरनशिप व प्लेसमेंट एकत्रित योजना या माध्यमातून Industry-Academia Interface सशक्त करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षण आणि उद्योग यामधील दुवा अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

Continue Reading
Advertisement

Trending