माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे निधन

Share

नवी दिल्ली प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचे निधन झाले आहे.

1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्या वेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंहांच्या धोरणामुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले

मनमोहन सिंह यांचा जीवनप्रवास
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तान मधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.

सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले .त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तात्कालीन पंतप्रधान नरसिंग राव यांच्याकडून मनमोहन सिंह यांची अर्थमंत्री पदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण झाले.

भारताला आर्थिक संघटनातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आणि 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले .

एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली होती

Related Articles

ताज्या बातम्या